Surprise Me!

Solapur | OK चा अर्थ शोधण्याची जिज्ञासा, झाडाखालच्या शाळेत शिकतोय OK Boy ! | Sakal Media |

2021-11-16 1 Dailymotion

#solapur #okboy #maharastra #child #school
आपली मातृभाषा किंवा बोलीभाषा कोणतीही असली, तरी ती भाषा बोलताना OK हा इंग्रजी शब्द हमखास वापरला जातो. OK हा इंग्रजी शब्द प्रत्येकाच्या बोलण्यात कितीतरी वेळा येत असतो. तेव्हा याचा अंदाजही येत नाही, की आपण किती वेळा OK उच्चारतो. बालदिनाच्या निमित्ताने रोपळे (ता. पंढरपूर) येथील अरुण माळी या शिक्षकाने मोफत सुरू केलेल्या झाडाखालच्या शाळेत काही मुलांशी संवाद साधला, तेव्हा पहिलीच्या वर्गात शिकणारा सोहम महादेव लोखंडे (वय 7) हा चिमुुकला त्याच्या प्रत्येक वाक्‍यात OK हा इंग्रजी शब्द उच्चारत होता. OK म्हणजे सांगितलेले काम करतो, असा त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. याबाबत सोहमने ओके म्हणायला मला शाळेत सरांनी शिकवल्याचे सांगितले. सोहमची आई अश्विनी व वडील महादेव हे शेती करतात. घरातले सर्वजण त्याला चिकू म्हणतात. चिकूच्या OK उच्चारण्याच्या लकबीमुळे तो आज Ok Boy ठरला आहे